Saturday, 20 October 2018

Bhagwan Bhaktigad Savargon Ghat दसरा मेळावा 2018

सावरगावी पहा दाटला ,
भक्ती शक्ती चा महासागर !
रावण दहन करणार रणरागिनी,
दसरा मेळाव्याचा हाच जागर !!
पाहुन साठवावं... साठवुन आठवावं
असे हे क्षण ...
|| दसरा मेळावा 2018 ||


"तू चोरी छुपे दबे पाव मत आना
सामने से वार कर फिर मुझे आजमाना"
- पंकजाताई मुंडे
जिथे नजर जाईल तिथपर्यंत जनसागर उसळला होता आणि ह्यापुढे असाच जनसागर उसळत राहणार सावरगावच्या "भगवान भक्तीगडा"वर !!!
‘वाघाच्या पोटी वाघिणच जन्माला येईल’ असं म्हणत आज संत भगवानबाबा यांचे जन्मस्थळ असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे दसरा मेळाव्याला सुरूवात केली. या मेळाव्यात भगवानबाबांच्या २५ फूट उंचीच्या मूर्तीचे लोकार्पणही झाले. या दसरा मेळाव्याला न भूतो न भविष्यती अशी गर्दी झाली होती.

मी आणि आपले सरकार मराठवाड्याकडे दुर्लक्ष करणार नाही. माझ्या कारखान्याच्या शेतकऱ्यांना FRP साठी पैसे नव्हते, तेव्हा माझ्या आईने स्वत:ची जमीन गहाण ठेवून पैसे दिले. तोडपाणी करण्याची कामं आम्ही करत नाही. सत्तेत असो किंवा विरोधात आम्ही जनतेचे अश्रू पुसण्याचं काम केलं. उद्याचा दिवस मावळायच्या आत ‘ऊसतोड कामगार मंडळ’ जाहीर झाल्याशिवाय राहणार नाही, हे माझं वचन आहे. २०१४साली ९९ टँकर होते. पण, मी मंत्री झाल्यापासून चार वर्षात एकही टँकर लागला नाही. ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातातील कोयता खाली ठेवण्यासाठी मी संघर्ष करत आहे. आम्ही करमणुकीचे कार्यक्रम करत नाही. लपून वार काय करता, समोरून वार करा. मी कोणालाच घाबरत नाही ना मला कोणत्याही पदाची लालसा नाही. मी तुमच्यामुळे मंत्री झालेय आणि महाराष्ट्रात २०१९ला भाजपाच्या विजयाचीच घंटा वाजणारच. मुंडेसाहेब किंगमेकर होते, त्याच जागी जनतेने मला बसवलं आहे.
कसा मावेल कॅमेरात हा उत्साह आणि कसं मावेल हे वादळ ...यातील प्रत्येकाचे हात जोडून नम्र आभार .. नतमस्तक आहे मी या जनसागरासमोर.. तुमच्या मी सदैव ऋणात राहीन ...उतणार नाही ,मातणार नाही ,मुंडे साहेबानी दिलेला वसा टाकणार नाही ..मी रुकणार नाही ,थकणार नाही कधी ही तुमच्या शिवाय कोणासमोर झुकणार नाही.

 🙏🙏आदरणीय ताईसाहेब आपण सावरगाव घाट श्रीसंत भगवान बाबा जन्म स्थळी गोरगरीब, ऊस तोड कामगार, समाज बांधव, व बहुजनसाठी मेळावा घेऊन 
आम्हा सर्वांना मार्गदर्शन करुन आमचा स्वास मोकळा करुन दिलात त्याबद्दल आम्ही सर्व आपले भावंड आपले मनापासून आभारी आहोत. 🙏🙏

2 comments:

Bhagwan baba png 5