गहिनीनाथ गडाचे महंत हभप पुंडलिक महाराज यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या जाण्याने गहिनीनाथ गड पोरका झाला. गडाच्या भक्त शोकसागरात बुडाला आहे. गहिनीनाथ गडाचे महंत पुंडलिक महाराज गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. वैराग्य महामेरू श्री संत वामनभाऊ महाराज यांचे पुंडलीक महाराज शिष्य होते. शुक्रवारी गडावरच त्यांचे आजारपणात निधन झाले.
वारकरी संप्रदाय व गुरुपरंपरेतील महत्वपूर्ण व्यक्तिमत्व गमावले – धनंजय मुंडे
श्री. क्षेत्र गहिनीनाथगड संस्थानचे महंत हभप पुंडलीक महाराज यांच्या निधनाने बीड जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील व गुरुपरंपरेतील अत्यंत महत्वाचे व्यक्तिमत्व गमावले आहे, असे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले. वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ यांचे शिष्य हभप पुंडलीक महाराज यांनी कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून जिल्ह्यात संत परंपरेतील विचारांची रुजवन केली होती. पुंडलीक महाराजांन अमलकी एकादशी दिवशी देवाज्ञा व्हावी हा विलक्षण योगायोग असल्याचे म्हणत धनंजय मुंडे यांनी हभप पुंडलीक महाराजांना श्रद्धांजली वाहिली आहे.
No comments:
Post a Comment