Sunday, 21 October 2018

Pankaja Mundhe

स्वाभिमानाशी तडजोड न करता निर्माण केलेले अस्तित्व जपण्यासाठी अविरत संघर्ष करावा लागत असतो.
साहेबांचे वारसदार म्हणून पदरात पडलेल्या गोर,गरीब,वंचित तसेच ऊसतोड मजुरांच्या पालकत्वाची जिम्मेदारी व्यवस्थितरित्या पार
पाडण्यामागे खरचं खूप मोठ्या संघर्षाचा भाव असतो..!



पाऊलोपाऊली निर्माण झालेल्या संकटाच्या झळा आपल्या झोळीतील जनतारुपी लेकरांना लागू नयेत त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत आयुष्याच्या वाटेवरची सर्व दुःखे बाजूला करुण, सतत अग्रेसर राहत राजकारणातील व जनतेच्या मनातील सर्वोच्च स्थानी विराजमान होण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते..!
सत्तेत असताना जनतेच्या महत्वकांक्षाना सीमा नसते,प्रत्येक गोष्ट किंवा इच्छा सत्तेत असताना पूर्ण होतीलच असे नसते, पण काहीप्रमाणात पूर्ण झालेल्या गोष्टींमध्येच आपल्या सर्वांचे समाधान असले पाहिजे हा विश्वास एखाद्या चिरकाल टिकवावयाच्या नेतृत्वात जनतेने ठेवणे अपेक्षीत आहे..!
भगवानबाबांचे आशीर्वाद घेऊन, मुंडे साहेबांनी निर्माण केलेले समाजातील अस्तिव व पंकजाताईंनी समाजासमोर सिद्ध करून दाखवलेले स्वकर्तृत्व यांचं समीकरण म्हणजे दसरा मेळाव्याला उलटलेला जनसागर होय.
मेळाव्याला जमा झालेला जनसागर हा बाबांवर व मुंडे साहेबांवर प्रेम करणारा तर होताच पण पंकजाताईंनी केलेल्या चार वर्षातील विकासकामावर अभिमान आणि गर्व करणारा देखील होता.
साहेबांच्या पोटी जन्म घेऊन, साहेबांच्या बोटाला धरून, राजकारणात आलेल्या ताईंनी साहेबांच्या नावाचा वापर करून गर्दी जमवलीच असेल ,तर यात विरोधकांना पोटशूळ येण्यासारखे काय आहे?
साहेब हे केवळ ताईंचेच पिता होते असे नाहीतर पूर्ण समाजाने साहेबांना पितृत्व बहाल केलेले आहे,
भावनात्मक राजकारण करण्यासाठी त्या व्यक्तींबद्दल समाजामध्ये भावना असणे गरजेचे असते ,एखाद्या पित्याचे समाजाप्रतीचं योगदान आणि कार्य हे वाखाणण्याजोगे नसेलच तर त्यांच्या प्रति समाज हा भावनाहींन असतो. तुम्ही घातलेली भावनीक साद ही त्या ठिकाणी व्यर्थ जाते हे न समजण्याइतपत विरोधक दुधखुळे असतील असे वाटले नव्हते..!
पंकजाताईं सत्तेत आल्यापासून समाजातील प्रत्येक घटकांच्या नशिबी सत्तेचा लाभ पोहचला तर याच गोष्टींचे दुःख विरोधकांच्या वाट्याला आले.
दसरा मेळावा होण्यापूर्वी कोल्हेकोई करणाऱ्या विरोधकांना मेळाव्याच्या अभूतपूर्व यशामुळे बिळात जाऊन बसायची वेळ आली. विरोधकांना तोंडघशी पडल्याचे पाहण्याची व नि:शब्द होण्याची यशस्वी महागाथा या मेळाव्यात लिहण्यात आली. यातच आपला मेळावा यशस्वी झाल्याचे सुख आणि समाधान आहे..!
होय,
वाघाच्या पोटी वाघीणच जन्मते..!
वीस वर्षांपूर्वी गृहमंत्री असताना साहेबांनी केलेल्या कामांचे दाखले आजघडीला देखील दिले जातात.गुन्हेगारीचे साम्राज्य उद्धवस्त करून टाकणारे मुंडे साहेब हे संपुर्ण राज्यातील जनतेच्या सदैव आठवणीत राहतील.याचप्रमाणे पंकजाताईंनी केलेले कार्य येणाऱ्या काळातील सर्व राजकीय पुढाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे..!
महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपाला सत्तेचे राजकारण करत असताना नेहमी मुंडे साहेबांचा चेहरा समोर दिसायचा पक्षातील प्रत्येक नेत्यांच्या विजयात मुंडे साहेबांची किंगमेकर ची भूमिका अविस्मरणीय आहे.
आज या क्षणी भाजपाला कोणत्याही पदाबाबत महत्वकांक्षी नसलेल्या पंकजाताईंची गरज परत एकदा राज्यात सत्ता स्थापनेसाठी पडणार आहे येणाऱ्या निवडणुकीत पक्षाच्या प्रत्येक नेत्यांच्या विजयात पंकजाताईंची भूमिका किंगमेकर ची असल्याचे चित्र स्पष्ट आहे..!
पंधरा वर्षाच्या आघाडी सरकारच्या कालखंडात भ्रष्टाचाराने भरभटलेल्या राजकारणाला तिलांजली देत पंकजाताईंच्या सरकारने राजकारणाची व्याख्या बदलली.
भ्रष्टाचाराने गंजलेल्या ग्रामविकास खात्याचे पंकजाताईंच्या परिस स्पर्शाने सोने तर झालेच,एवढेच नाहीतर या खात्यामार्फत राबवलेल्या प्रत्येक योजणेमुळे जनमानसांचे देखील सोने झालेले आहे.
खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंकजाताईंबद्दल काढलेले गौरवोदगार हीच ताईंच्या ग्रामविकास खात्या मार्फत करण्यात आलेल्या कामांची पावती आहे.
प्रधानमंत्री आवास योजना महाराष्ट्रात पंकजाताईंनी प्रभावीरित्या राबवल्यामुळे या महत्वपूर्ण योजनेचा लोकार्पण सोहळा खुद्द प्रधानमंत्री यांच्या हस्ते पार पडला..!
ऊसतोड कामगारांच्या प्रस्थापित प्रश्नांना मार्गी लावत ताईंनी ऊसतोड कामगारांच्या भविष्याला सुरक्षित करणाऱ्या प्रभावी मागण्या मान्य करत ऊसतोड मजुरांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ऐतिहासिक क्षण सुवर्ण अक्षरात लिहिला..!
पंकजाताईंनी दुष्काळाने होरपळलेल्या भागांना भेटी देऊन तेथील शेतकऱ्यांमध्ये दुष्काळाशी दोन हात करण्याचं बळ निर्माण करून दिले. दुष्काळात नेहमी जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहत, दुष्काळामुळे झालेली नुकसानभरपाई शेतकऱ्यांना वेळोवेळी मिळवुन देत पंकजाताईंनी स्वतःची कार्यकुशलता सिद्ध करून दाखवलेली आहे..!
लोकशाहीतील राजकीय पक्षांमध्ये सर्वोच्च स्थानी असलेल्या पक्षातले ताईंचे स्थान, त्यांचं वर्तन, त्यांचा अजेंडा, त्यांचं नेतृत्व, लोकांशी असलेलं त्यांचं नातं, त्यांचं राजकीय तत्त्वज्ञान, त्यांचं सत्ताकारण, या सर्वांमुळे त्या राज्यातच नव्हे तर देशातील राजकारणात अग्रेसर झालेल्या आहेत..!
"प्रवाहाच्या विरोधात जाऊन संघर्ष करण्याची धमक वाघाच्या पोटी जन्म घेतलेल्या वाघिणीच्याच अंगात असते"..!

No comments:

Post a Comment

Bhagwan baba png 5