Tuesday 30 October 2018

Pankaja Gopinath Munde

महाराष्ट्रातील बचत गटाच्या महिलांना घेऊन अमेरिकेतील नामांकित उद्योगांना भेट देण्यास सुरवात केली. आज सर्व प्रथम सिलिकॉन वॅल्लीमधील फेसबुक कंपनीला भेट दिली. बचत गटाच्या सर्व महिला आपले अनुभव मांडायला, उत्पादने जागतिक स्तरावर दाखवायला अत्यंत उत्सुक होत्या. फेसबुक, व्हाट्सअपच्या प्रतिनिधींशी आम्ही प्रथम राज्यामध्ये कार्यरत असलेल्या विविध योजनांबद्दल चर्चा केली आणि त्यांना आम्ही महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने महिला सबलीकरण, त्यांच्यामधील उद्योजकता ह्याला प्रोत्साहन देत आहोत ह्याची माहिती दिली. त्यांनीसुद्धा अत्यंत लक्षपूर्वक नीट समजून घेतले आणि बचत गटाच्या उत्पादन जागतिक बाजारपेठ पर्यंत कशी पोचू शकतील ह्याबद्दल माहिती दिली.







यावेळी या दोन्हीही समाज माध्यमांना त्यांच्याकडील तंत्रज्ञान भारतातील आणि राज्यातील महिलांना देऊन त्यांना त्यांच्यातील कौशल्यांना जगासमोर मांडण्यासाठी महाराष्ट्र सरकार बरोबर काम करण्याचे आवाहन केले. यावेळी फेसबुक आणि व्हाट्सअप राज्यातील युवकांना तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एकत्र काम करणार आहेत. दोन्ही समाज माध्यमांच्या प्रतिनिधींनी डिसेंबर 2018 मध्ये राज्यात येऊन, ही भागीदारी पुढे नेण्यासाठी सहमती दिली. यावेळी फेसबुक प्रतिनिधी मीरा पटेल, आरती सोमण, ब्रेंडा आणि कोलिन, व्हाट्सअप प्रतिनिधी बेन्सापल, सचिव असीम गुप्ता, उमेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला, फिक्कीचे प्रतिनिधी रुबाब सूद आणि बचत गटांच्या महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.
Our USA trip started with visit to @Facebook HQ in bay area, CA. All were very excited to showcase SHG products. Discussed at length with Facebook WhatsApp teams regarding our govt’s flagship programs #MILAP#UMED n how thro’ MSRLM we r alleviating ppl out of poverty. They have agreed to visit Maharashtra in Dec'18 to take this partnership to next level.

No comments:

Post a Comment

Bhagwan baba png 5