Sunday, 4 November 2018

कारखाना जायची वेळ आली तेव्हा बबनरावांना जाग आली आणि भगवानगड जायला लागला तेव्हा मला!



नगर : ''भगवानगड कोणा एकाच्या देणगीतून मोठा झालेला नाही. नुसती भाषणे करून भगवानगड आपला होत नाही. बाबांच्या गादीत मोठी ताकद आहे. एखाद्याला घडवू शकते आणि एखाद्याला संपवूही शकते,'' अशा शब्दांत गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर शाब्दिक वार केला.

केदारेश्वर साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या प्रारंभप्रसंगी महंत नामदेव शास्त्री यांनी भाषणातून अप्रत्यक्षपणे मुंडे यांना टीकेचे लक्ष्य केले. 
भगवानगडाची ताकद मला समजली, म्हणून गड शाबूत आहे, असे सांगून महंत शास्त्री म्हणाले, राजकारणात तत्त्वनिष्ठ असलेले बबनराव ढाकणे फिरले असते तर प्रताप ढाकणे आमदार झाले असते. पण कारखाना जायची वेळ आली, तेव्हा त्यांना जाग आली आणि भगवानगड जायला लागला, तेव्हा मला जाग आली. अर्थात त्यामागे बाबांची पुण्याई होती. 
भगवान शिक्षण संस्थेसारखे हाल गडाचे होऊ नये, म्हणून आपण गडावरचे राजकारण बंद केले. ती कोणा एकाची वैयक्तिक मालमत्ता नाही. काही लोक बाबांची ताकद मानायला तयार नाहीत. आपण पारमार्थिक जगात वावरतो, त्यामुळे आपल्याला व्यावहारिक जग समजत नाही. त्यामुळे काही चुका घडल्या असतील, पण सुज्ञ आणि व्यावहारिक पिढीवर आपला विश्वास आहे, असे ते म्हणाले. 

No comments:

Post a Comment

Bhagwan baba png 5